काशी विश्वेश्वरला बारा हजार तर महालक्ष्मी-बाळुमामा तीर्थ क्षेत्राला पाच हजार पाचशे नागरिकांना मोफत दर्शन, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सध्या धावपळीच्या या मोबाईल विज्ञान युगात धार्मिकतेकडे आणि अध्यात्मिकतेकडे लोकांचा कल कमी होत चालला आहे. हेच लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभेचे प्रमुख किरण दगडे यांनी आपल्या युवा मंचामार्फत या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अध्यात्म, परमार्थ, मिळवण्यासाठी आपली हिंदू धर्म संस्कृती जपण्यासाठी मोफत तीर्थक्षेत्र दर्शन घडविले. तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर या ठिकाणी तीन तीन हजारांचा एक टप्पा असे चार टप्पे नियोजन बद्ध प्रवास करत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता, काळजी घेत सुरक्षितरित्या पार पाडत आपली एक वेगळी ओळख समाजात निर्माण केली. यामध्ये नागरिकांना मोफत चहा, पाण्यापासून, दुपारचे जेवण , नाष्टा ,रात्रीचे जेवण, वैद्यकीय उपचार, अशा सर्व सुख सुविधांचा प्रवासात लाभ दिला.
भोर विधानसभेतील नागरिकांसाठी आत्ता पर्यंत यशस्वी चार काशीयात्रा तसेच कोल्हापूरची अंबाबाई, आदमापुर बाळूमामा तीर्थ क्षेत्र दर्शन यात्रा पार पडल्या. कोल्हापूर दर्शन साडेपाच हजार नागरिक, तर काशीयात्रा धाम १२ हजार नागरिकांना दर्शन घडवुन अध्यात्माच्या जवळ नेण्याचं प्रयत्न केला. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कोणत्याही नेत्याने आजपर्यंत एवढा मोठा खर्च करत असे यशस्वी कार्य केले नाही, परंतु किरण दगडे यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र दर्शन घडविल्यामुळे त्यांचे तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत असुन त्यांना आधुनिक काळातील श्रावण बाळ असे संबोधले जात आहे
“मी केलेली ही लोकांची सेवा,त्यांना घडविलेले देव दर्शन , तीर्थक्षेत्र दर्शन हे माझ्या समाजसेवेचा एक भाग आहे. मी फक्त एक निमित्त असुन कर्ता करविता तो परमेश्वर आहे. याबाबत परमेश्वराचे धन्यवाद मी मानतो. हा लोकसेवेचा हा प्रवास असाच अविरत सुरू राहण्यासाठी मी भोर, वेल्हा ,मुळशी या तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला माझ्या पाठी भक्कमपणे उभे रहावे अशी आशा व्यक्त करतो व ते पाठीशी भक्कमपणे उभे राहतीलच हा विश्वास मलाआहे.” किरण दगडे पाटील.
निवडणुक प्रमुख भोर विधानसभा, भा.ज.पा
नगरसेवक, पुणे म.न.पा.