Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breking News | घरकुलाच्या हप्त्यासाठी १५ हजारांची लाच; भोर तालुक्यात ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

by SBPRNL
May 19, 2026
Breking News | घरकुलाच्या हप्त्यासाठी १५ हजारांची लाच; भोर तालुक्यात ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

भोर [ प्रतिनिधी इम्रान आतार ] : तालुक्यातील महुडे खोऱ्यात मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. शिंद व गवडी गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे (रा. बारामती) यांना घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदार हे शासनाच्या घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत. घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक सालगुडे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. शासकीय कामासाठी पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली. चौकशीत तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी सापळा रचला. मंगळवारी भोलावडे – शिंद मार्गावर ठरविण्यात आलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवक सालगुडे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून नागरिकांनी एसीबीच्या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे.

घरकुलासारख्या सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या योजनांमध्ये लाचेची मागणी होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे तालुक्यातील इतर शासकीय कार्यालयांमध्येही खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा धाक निर्माण झाला आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
मांडकीत २८ लाखांचा चंदनसाठा जप्त : पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

मांडकीत २८ लाखांचा चंदनसाठा जप्त : पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group