Tuesday, August 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

by SBPRNL
March 25, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

नसरापूर : नसरापूर–वेल्हा रोडलगत जांभळी (ता. भोर) गावच्या हद्दीत असलेल्या ‘७/१२ शेतकरी व्हेज-नॉनव्हेज हॉटेल’मध्ये एक अत्यंत धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. हॉटेल मालकाच्या सासऱ्याचा हॉटेलमधील कामगाराने निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक करत वेगवान कारवाई केली आहे. सागर लक्ष्मण कुमार राणा (वय २०, मूळ रा. पाटण जिल्हा बैतडी, देश नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर किसन बापू सुर्वे (वय ७५, सध्या रा. जांभळी, मूळ रा. भोंगवली ता. भोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी अनिल सखाराम रसाळ (वय ४८, धंदा शेती/हॉटेल, रा. jांभळी ता. भोर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मार्च रोजी रात्री ११.०० ते दि. २५ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुर्वे हे नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये झोपलेले असताना आरोपी सागर लक्ष्मण कुमार राणा याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने मोबाईल घेऊन न दिल्याच्या कारणावरून राग मनात धरला होता. याच रागातून त्याने सुर्वे यांच्या डोक्यात बोथट हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर राजगड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपी फरार झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली.

चौकट : ६ तासांत कात्रज चौकातून आरोपी जेरबंद

पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी सागर लक्ष्मण कुमार राणा हा कात्रज चौकात थांबला असून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ दोन पथके कात्रज चौक येथे रवाना करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार मदने, निबांळकर तसेच पोलीस अंमलदार नलावडे, कुंभार, भालेराव आणि भडाळे यांनी सहभाग घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group