Tuesday, August 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

by SBPRNL
March 28, 2026
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

नसरापूर : पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या तसेच १८ गुन्हे दाखल असलेला व त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. २७ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हवेली पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार, कुलदिप हरिओम वाल्मिकी (वय ३२, रा. एनडीए रोड, सरस्वती चौक, उत्तम नगर, ता. हवेली, जि. पुणे) हा आरोपी आगळंबे फाटा येथे थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तत्काळ सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, तो राजगड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले. तसेच तो फरार यादी क्रमांक २२२१/२५ मध्ये समाविष्ट असल्याचेही स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वी तब्बल १८ गुन्हे दाखल असून त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता. त्याच्या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत, महेश बनकर, सागर नामदास, अमोल शेडगे, मंगेश भगत व तुषार भोईटे यांचा समावेश होता.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group