भोर: शहरापासून जवळ असलेल्या भोलावडे गावाने मात्र धार्मिक परंपरेचा वारसा जपत मिरवणुकीत ढोल ताशा , डीजे यांचा वापर न करता वारकरी सांप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीची गणेशाची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडली.
या मिरवणुकीत या गावातील तरुणांनी लहान मुलांपासून , महिला थोरात मोठ्यांपर्यंतची नागरिकांनी जनजागृती करत सहभाग घेतला. आजच्या पाश्चात्य संस्कृतीत ज्याप्रमाणे मुलांना सांताक्लॉज बनवता त्याचप्रमाणे आपल्या मुलांना वारकरी सांप्रदायाचे पोशाख घालून वारकऱ्यांचे महत्त्व देखील सांगण्यात यावे.
हिंदू धर्मांचे रक्षणकसे करावे, मुलांनी महिलांनी मुलींनी कपाळी कुंकवाचा टिळा लावून मराठी संस्कृतीचे जपण करणे, मुलींवरील अत्याचार रोखणे, मुलीला सन्मानास्पद वागणूक देणे, हिंदू धर्म जनजागृती, गाई वाचवा- देश धर्म वाचवा, मराठी धर्म -हिंदू धर्म परंपरा अस्मिता वाचवण्यासाठी लहान मुलांना प्रेरित करणे , शेतकऱ्यांचे रक्षण करणे अशा आशयाचे असंख्य फलक लावून या मिरवणुकीत संदेश देण्याचा प्रयत्न या भोलावडे गावातील तरुणांनी केला.
अशाच प्रकारे गणेशोत्सव , नवरात्रोत्सव, शिवजयंती अशा अनेक धार्मिक सणांमधन हिंदू जनजागृती करण्यासाठी या गावातील तरुण नेहमीच अग्रेसर असतात असे या गावातील तरुणांकडून सांगण्यात आले.