Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळः राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू, सूत्रांची माहिती

by SBPRNL
September 17, 2024
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भोरः येथील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

ही घटना राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील एका गावात घडली आहे. या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून केले पलायन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी अल्पवयीन आरोपीच्या  शेजारी राहत असून त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी अल्पवयीन मुलाकडे पीडित चिमुरडी खेळण्यास येत असल्याची.  लहान मुलीची आई कपडे धूत असताना अल्पवयीन आरोपीने चिमुरडीला त्याच्या खोलीत नेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाजाने मुलीची आई बंद असलेल्या खोलीकडे धावत गेली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर  अल्पवयीन आरोपीने मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात  अल्पवयीन मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून, या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

एकामागोमाग घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर

सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील सोमवारी चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच दोन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tags: Bhorcrimenewsrajgadrajgadnewsshiravalpolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

जेजुरीः आज मिरवणूक आहे 'ही' बातमी तुमच्यासाठीच: रस्त्याचा अंदाज घेऊनच मिरवणूकीचे देखावे तयार करावेत

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group