Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

by SBPRNL
June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील नसरापूर गावातील शिवगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याबाबत राजगड न्यूजने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर नसरापूर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून परिसरातील काही चिकन दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून शिवगंगा नदीच्या पुलाखाली व नदीकाठावर चिकन दुकानांमधून निर्माण होणारा कचरा, टाकाऊ पदार्थ आणि इतर घाण टाकली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नदीचे प्रदूषण वाढत आहे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कचरा नदीपात्रात वाहून जाऊन पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

या संदर्भात राजगड न्यूजने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नसरापूर ग्रामपंचायतीने संबंधित चिकन दुकानदारांना नोटिसा बजावत नदीपात्रात अथवा नदीकाठावर कचरा टाकण्यास तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिशीत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित दुकानदारांनी दुकान परिसरात स्वच्छता राखावी, व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय भविष्यात कोणताही दुकानदार नदीपात्रात किंवा नदीकाठावर कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राजगड न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी शिवगंगा नदीपात्रातील आधीच साचलेला कचरा तातडीने हटविणे, नियमित स्वच्छता मोहीम राबविणे आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Bhornasarapur
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
Next Post
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group