Monday, July 20, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

by SBPRNL
July 20, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

राजगड न्यूज स्पेशल | जीवन सोनवणे

भोर : नऱ्हे येथे एका व्यापाऱ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना गंभीर असतानाच, त्यानंतर समोर आलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. दरोडेखोरांविरोधातील कारवाईदरम्यान जप्त झालेल्या रोकड रकमेच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित होत असून, राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्याचा प्रयत्न झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने मदतीसाठी खेड शिवापूर पोलीस चौकी गाठली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल केल्याचे सांगितले जाते. या घटनेदरम्यान दरोडेखोरांपैकी एक जण सुमारे ७३ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाल्याची माहिती आहे. तर दुसरी बॅग, ज्यामध्ये २३ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते, ती व्यापाऱ्यासह खेड शिवापूर पोलीस चौकीत आणण्यात आली.

याच बॅगेतील सुमारे ६ लाख ५० हजार रुपये कथितपणे वेगळे काढण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही रक्कम पुन्हा मूळ बॅगेत ठेवण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या आरोपांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जर चौकशीत या आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित राहणार नाही, तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवरील जनतेच्या विश्वासालाही धक्का देणारा ठरू शकतो. दुसरीकडे, चौकशीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सध्या या प्रकरणातील सर्व आरोपांची अधिकृत चौकशी आणि निष्कर्षाची प्रतीक्षा असून, सत्य समोर आल्यानंतरच जबाबदारी निश्चित होणार आहे.

नक्की प्रकरण काय ?

नऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, १७ जुलै २०२६ रोजी एका व्यापाऱ्याने व्यवसायातील सुमारे १ कोटी रुपयांची रोख रक्कम चव्हाण एंटरप्रायजेसकडे देण्यासाठी नेण्याचे ठरवले होते. १८ जुलै रोजी सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल येथून दोन कापडी बॅगांमध्ये रोकड घेऊन व्यापारी, विक्रम चाकणकर, किरण आपटे व अन्य एक व्यक्ती सॅन्ट्रो कारमधून निघाले. सुरुवातीला एचडीएफसी बँक, नऱ्हे येथे जाण्याचे सांगण्यात आले; मात्र कार नवले पुलावरून राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली.

यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी कार अडवून स्वतःला पोलीस असल्याचे सांगत, “तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात,” असे म्हणत रोख रक्कम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या चेहऱ्यावर तिखट पावडर फेकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गोंधळात ७३ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन किरण आपटे घटनास्थळावरून निघून गेले, तर २३ लाख ५० हजार रुपयांची दुसरी बॅग कारमध्येच राहिली.

त्यानंतर संबंधितांनी व्यापाऱ्याला थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत नेल्याचा आरोप आहे. तेथे स्वतःला पोलीस म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने व्यापारी बेकायदेशीर रोकड घेऊन जात असल्याचा दावा केल्यानंतर चौकीतील पोलिसांनी चौकशी सुरू केली. पुढे या संपूर्ण प्रकरणात विक्रम चाकणकर, अमेय काले, गणेश कदम व अन्य दोघांविरुद्ध संगनमताने दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नऱ्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

याच प्रकरणात नंतर खेड शिवापूर पोलीस चौकीत आणलेल्या २३ लाख ५० हजार रुपयांच्या रोकड बॅगेच्या हाताळणीबाबत गंभीर आरोप समोर आले असून, कथितपणे ६ लाख ५० हजार रुपये बाजूला काढण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. या आरोपांच्या अनुषंगाने राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, पोलीस निरीक्षकांनी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती आहे. या सर्व आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही..

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम
भोर

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group