Friday, October 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

by SBPRNL
July 28, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

शिरवळ | प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली. गरुडा गँगशी संबंधित असल्याची ओळख असलेल्या ओमकार क्षीरसागर याच्यावर प्रथम रॉड आणि विटांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी सलग तीन राऊंड गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी ओमकार क्षीरसागर याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात संशयित म्हणून साई गोलांडे, ओमकार माने, राकेश महतो आणि बाबू शेटे यांची नावे समोर आली आहेत.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे परिसरातील वर्चस्वाचा वाद किंवा कथित वेश्याव्यवसायाला विरोध हे कारण असावे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला ओमकार क्षीरसागर याला रॉड व विटांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली, तर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी केली. घटनास्थळाच्या पंचनाम्यात पिस्तुलाचे एक मॅगझिन तसेच गोळीबारात वापरण्यात आलेल्या काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक वैज्ञानिक पुरावे संकलित केले असून तपासासाठी ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.

या धक्कादायक घटनेमुळे शिंदेवाडीसह संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group