Saturday, August 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

by SBPRNL
August 8, 2026

भोर : रात्रीची वेळ… डायल ११२ वर फोन येतो. समोरून आवाज येतो—‘माझं अपहरण झालंय… मला मारहाण केली जात आहे… माझ्या सुटकेसाठी रिंगरोड कंपनीने १७ लाख रुपये माझ्या बँक खात्यावर जमा करावेत!’ माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क होते. मात्र, तपास पुढे सरकताच या कथित अपहरणाच्या कहाणीमागचं वेगळंच वास्तव समोर आलं.

राहठवडे येथील लेबर कॅम्पमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, चौकशीत अपहरणाची माहितीच खोटी असल्याचे निष्पन्न झाले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पोलिसांना कारवाई करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

राजेश वैजनाथ यादव (वय २५, सध्या राहठवडे लेबर कॅम्प, ता. हवेली; मूळ मध्य प्रदेश) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अजय संजयसिंग चांदा यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.५५ वाजता यादवने डायल ११२ वर संपर्क साधला. काही इसमांनी आपले अपहरण केले असून, ते आपल्याला मारहाण करणार असल्याचे त्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर रिंगरोड कंपनीने आपल्या बँक खात्यावर १७ लाख रुपये जमा करावेत, अन्यथा कंपनी जाळून टाकण्याची धमकी अपहरणकर्ते देत असल्याचेही त्याने सांगितले.

अपहरणासारखी गंभीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा हालचालीला लागली. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीची पडताळणी केली असता कथित अपहरणाच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या तपासात यादवने जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे आपत्कालीन हेल्पलाईनचा वापर करून पोलिस यंत्रणेला विनाकारण कारवाई करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

या प्रकरणी ७ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026

ताज्या बातम्या

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group