Friday, September 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

by SBPRNL
August 8, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

भोर : घराचे सुरू असलेले बांधकाम, त्यासाठी लागणारा खर्च आणि मुलाचे दारूचे व्यसन यावरून आई मुलाला वारंवार समजावत होती. ‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ असे सांगत असतानाच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी येथे शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी घडली.

या घटनेत बेबी काळू मालुसरे (वय ५२) यांचा मृत्यू झाला असून, आरोपी मुलगा समीर काळू मालुसरे (वय ३१) याला भोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

You might also like

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

म्हाळवडी येथे मालुसरे कुटुंबीयांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी पैशांची आवश्यकता असताना समीर दारूच्या आहारी गेल्याने आई त्याला वारंवार दारू पिऊ नको, असा सल्ला देत होती. याच कारणावरून शुक्रवारी दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे.

सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बेबी मालुसरे झोपण्यासाठी आडव्या झाल्या. त्यावेळी समीरने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर समीरने आईचा मृतदेह घरातच ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर शेजाऱ्यांना आई गावाला गेल्याचे सांगून घटनेची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सात वाजता दारूची नशा उतरल्यावर समीरने स्वतः आपल्या चुलत भावाला या घटनेची माहिती दिली. ‘आई उठत नाही, मी काल तिला मारलं होतं,’ असे त्याने चुलत भावाला सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर चुलत भावाने पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच भोर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपी समीर मालुसरे याला ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दारूचे व्यसन, घराच्या बांधकामाचा ताण आणि आईने केलेला विरोध याचा शेवट आईच्या हत्येत झाल्याने म्हाळवडी परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेमागील संपूर्ण परिस्थितीचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय जाधव, विशाल मोरे, दीपक गायकवाड व हेमंत भिलारे पुढील तपास करीत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

ताज्या बातम्या

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group