Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

by SBPRNL
September 7, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

भोर : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील ससेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील व आदर्श शिक्षिका सुवर्णा मारुती कापरे यांची ‘ग्लोबल टीचर’ म्हणून सिंगापूर येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे ससेवाडीच्या शैक्षणिक कार्याची दखल आता जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे.

शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता आणि कौशल्य विकासासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून ‘ग्लोबल गुरुजी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शिक्षकांना सिंगापूरमधील आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

विद्यार्थ्यांना भविष्यातील जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने सुवर्णा कापरे शाळेत विविध उपक्रम राबवत आहेत. कोडींग, परकीय भाषा, इको क्लब, मनोरंजक खेळ, खेळातून शिक्षण तसेच विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा त्या प्रभावीपणे वापर करतात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नवे कौशल्य विकसित व्हावे, यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषद पुणे, अमेझॉन फ्युचर आणि LFE टीम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कोडिंग प्रशिक्षण उपक्रमात कापरे यांनी सलग तीन वर्षे ‘टॉप टीचर’ म्हणून यश मिळविले आहे. तसेच शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेअंतर्गत परकीय भाषा फ्रेंच स्पर्धेत पुणे विभाग स्तरापर्यंत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘ग्लोबल टीचर’ म्हणून झालेल्या निवडीबद्दल भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने, विस्तार अधिकारी लोखंडे, केंद्रप्रमुख कारभळ, शिक्षक संघाचे नेते पोपट निगडे यांच्यासह मारुती कापरे, चांगदेव मसूरकर, महेंद्र आप्पा सावंत, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, विजयकुमार थोपटे, अनंत आंबवले, कमलाकर मोहिते, सुनील लेकावळे, विठ्ठल दानवले, भानुदास खुटवड, विकास खुटवड, हनुमंत चव्हाण, अजित वाडकर तसेच ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समिती ससेवाडी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कापरे यांची ही निवड ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली असून, त्यांच्या सिंगापूर अभ्यास दौऱ्यामुळे ससेवाडीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला जागतिक दृष्टिकोनाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
Next Post
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group