Sunday, August 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

by SBPRNL
July 10, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील उत्रोली आणि वडगाव जाळ परिसरातील शेतकरी व जमीनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भोर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) उभारण्यासाठी २२ ऑक्टोबर १९९२ रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या मौजे उत्रोली व वडगाव जाळ येथील एकूण २९३.३३ हेक्टर क्षेत्र संपादनातून वगळण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर अखेर पडदा पडला आहे.

या क्षेत्रामध्ये २९१.३३ हेक्टर खासगी जमीन आणि २.०० हेक्टर सरकारी जमीन समाविष्ट आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने २७ जून २०२६ रोजी याबाबत अधिकृत पत्र जारी केले असून, १६ जून २०२६ रोजी शासन राजपत्रात विनाअधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

You might also like

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

या निर्णयानुसार संबंधित २९३.३३ हेक्टर जमीन आता एमआयडीसीच्या संपादन प्रक्रियेतून अधिकृतपणे मुक्त झाली आहे. तसेच संबंधित जमिनींच्या महसूल अभिलेखांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

भोर औद्योगिक क्षेत्रासाठी सुमारे तीन दशकांपूर्वी ही जमीन अधिसूचित करण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे या परिसरात औद्योगिक क्षेत्राचा विकास प्रत्यक्षात झाला नाही. त्यामुळे संपादनाच्या प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या वापरावर मर्यादा येत होत्या. जमीन विक्री, बँक कर्ज, विकासकामे आणि इतर व्यवहारांमध्येही अडचणी निर्माण होत होत्या.

या निर्णयामुळे उत्रोली व वडगाव जाळ परिसरातील शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आता संबंधित जमिनींवरील निर्बंध हटल्याने जमीनमालकांना त्यांच्या मालमत्तेचा वापर, विकास आणि व्यवहार पूर्ववत करता येणार आहेत.

दरम्यान, या निर्णयानंतर तालुक्यातील काही तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. भोर तालुक्यात एमआयडीसी उभारल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, जमीन संपादनातून वगळण्याच्या निर्णयामुळे भविष्यातील औद्योगिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करतानाच तालुक्यात नवीन उद्योग उभे राहावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, अशी मागणीही तरुणांकडून करण्यात येत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
Next Post
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group