Saturday, October 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव रॅकेटचा तपास व्यापक होणार? नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी

by SBPRNL
June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर : दौंड तालुक्यातील केडगाव येथे उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असताना, या प्रकरणाचे धागेदोरे भोर तालुक्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. किकवी येथील डॉक्टर मंदार सुरेश माळी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुक्यात या प्रकरणाबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

यवत पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याला अटक करण्यात आली असून, डॉ. अतुल अंकुश जाधव, नरेंद्र साहेबराव ठाकरे, डॉ. मंदार सुरेश माळी आणि सुंदरम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग निदान केल्याचा आरोप असून, या रॅकेटमधून गेल्या दोन वर्षांत ५०० हून अधिक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

किकवीच्या डॉक्टरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भोर तालुक्यात या प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. काही नागरिकांकडून या रॅकेटचा संबंध भोर तालुक्यातील इतर काही डॉक्टरांशी किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींशी असू शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, भोर तालुक्यातील इतर कोणत्याही डॉक्टरांचा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस किंवा आरोग्य विभागाने अशा कोणत्याही सहभागाची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे या सर्व बाबी सध्या चर्चेच्या आणि तपासाच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने संपूर्ण तपास उच्चस्तरीय पातळीवर करून संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

Tags: BhorkedgaonMaharastrapolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
Next Post
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 23, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group