Friday, August 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधीची मागणी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि पर्यटन विकासावर आमदार शंकर मांडेकरांचा भर

by SBPRNL
May 19, 2026
भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधीची मागणी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि पर्यटन विकासावर आमदार शंकर मांडेकरांचा भर

भोर : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत भोर, राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी विविध प्रश्न मांडले.

या बैठकीत पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाटबंधारे, आरोग्य सुविधा, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा तसेच वाहतूक व्यवस्थेच्या विकासासाठी वाढीव निधी देण्याची मागणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे अपूर्ण असल्याने ती तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही गावांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने त्यांची चौकशी करून संबंधित कामांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

मुळशी तालुक्यातील श्री वाघजाई देवी देवस्थान, राजगड परिसरातील विविध धार्मिक स्थळे तसेच भोरमधील ऐतिहासिक मंदिरांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अद्यापही रस्ते, वीज आणि आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे आमदार मांडेकर यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरण विभागासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत व रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भोर आणि राजगड परिसरात नवीन क्रीडा संकुले उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, तसेच वीर बाजी पासलकर स्मारकाच्या विकासासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय भोर-मुळशी भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात आणि वन विभागाच्या प्रलंबित परवानग्या तातडीने मंजूर कराव्यात, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
पुणे जिल्हा परिषद सेवक पतसंस्थेत १५ वर्षांनंतर सत्तांतर; दिलीप लोखंडे यांचा दणदणीत विजय

पुणे जिल्हा परिषद सेवक पतसंस्थेत १५ वर्षांनंतर सत्तांतर; दिलीप लोखंडे यांचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group