Friday, August 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

by SBPRNL
May 26, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सारोळे : भोर तालुक्यातील न्हावी गाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी नीरा नदीकाठी पाण्यातील मोटारींसाठी टाकण्यात आलेल्या कॉपर केबलवर डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २५ मे) सकाळी उघडकीस आली. या चोरीत तब्बल १ लाख ६ हजार ८०० रुपयांच्या १७८० मीटर कॉपर केबलची चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत विकास रामचंद्र चव्हाण (रा. पेंजळवाडी, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते दि. २५ मे रोजी सकाळच्या दरम्यान ही चोरी झाली. न्हावी येथील नीरा नदीकाठी अनेक शेतकऱ्यांनी पाण्यातील मोटारी चालवण्यासाठी कॉपर केबल टाकल्या होत्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या केबल कापून चोरून नेल्या. सकाळी शेतकरी मोटार सुरू करण्यासाठी नदीकाठी गेले असता ही बाब उघडकीस आली.

या चोरीत विकास चव्हाण यांच्या ३२० मीटर, हेमंत चव्हाण यांच्या २५० मीटर, मोहन चव्हाण यांच्या २०० मीटर, संजय सोनवणे यांच्या १८० मीटर, कुंदन सोनवणे यांच्या २८० मीटर, वैभव सोनवणे यांच्या २५० मीटर तसेच गोपाळ सोनवणे यांच्या ३०० मीटर कॉपर केबलची चोरी झाली आहे. एकूण १७८० मीटर केबल चोरीस गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सध्या शेतीसाठी पाण्याची गरज वाढलेली असताना मोटारींच्या केबल चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल कोल्हे करत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group