Tuesday, August 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

by SBPRNL
July 3, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोर : पंचायत समितीतील विकास निधीच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. भाजपचे सदस्य रोहन बाठे, सुषमा चव्हाण, गीता आंबवले आणि माऊली पांगारे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या सभापतींसह सत्ताधारी सदस्यांवर निधी वाटपात पक्षपातीपणा केल्याचा गंभीर आरोप केला.

भाजप सदस्यांनी सांगितले की, सन 2022 ते 2026 या कालावधीत पंचायत समितीला ₹5 कोटी 10 लाख 51 हजार इतका विकास निधी उपलब्ध झाला. निधी नियोजनासाठी सभापतींनी विशेष सभा बोलावून सदस्यांकडून कामांची यादी मागविली होती. त्यावेळी प्रत्येक सदस्याने ₹15 लाखांच्या कामांची शिफारस करावी, असे सांगण्यात आले होते.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

मात्र प्रत्यक्ष निधी वाटप करताना वेगळेच चित्र दिसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वाट्याला सुमारे ₹65 लाखांचा निधी येणे अपेक्षित असताना प्रत्येकी केवळ ₹20 लाखांची कामे मंजूर करण्यात आली. उर्वरित निधीचे वाटप सत्ताधारी सदस्यांच्या सोयीनुसार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

“सभापती नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे समजत नाही. वेळेचे नियोजन पाळले जात नाही. आम्हाला विश्वासात न घेता निधीचे वाटप करण्यात आले असून आमच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. अधिकाराबरोबर जबाबदारीही सभापतींचीच आहे. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचाही आम्ही विचार करत आहोत,” असे भाजप सदस्यांनी स्पष्ट केले.

या निधीतून १२८ विकासकामांचा समावेश करण्यात आला असून, ₹१५ हजारांपासून ₹१० लाखांपर्यंत खर्चाच्या गटारे, रस्ते, वॉटर फिल्टर, सामाजिक सभागृहे, सौरदिवे आणि परिसर सुशोभीकरण यांसारख्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप सदस्यांनी केलेल्या आरोपांमुळे पंचायत समितीतील राष्ट्रवादी-भाजप वाद आणखी तीव्र झाला असून, या आरोपांवर सभापती आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका काय असणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group