Saturday, August 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

by SBPRNL
June 9, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

राजगड, प्रतिनिधी : राजगड तालुक्यातील सिंगापूर-कुसारपेठ येथे विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यासोबत त्यांच्या गाईचाही मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूर-कुसारपेठ येथील रहिवासी व शेतकरी विठ्ठल भागू ढेबे (वय ५५) हे सोमवारी आपल्या गाईंना चरण्यासाठी गावालगतच्या डोंगर परिसरात घेऊन गेले होते. यावेळी जवळच असलेल्या वीज खांबावरील तार अचानक तुटून एका गाईच्या अंगावर पडली. तार पडताच गाईला विजेचा जबरदस्त शॉक बसला. गाईला वाचविण्यासाठी विठ्ठल ढेबे यांनी धाव घेतली. मात्र, तारेला स्पर्श झाल्याने त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गाईचाही मृत्यू झाला आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत शेतकरी आणि गाय या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ढेबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीज खांबावरील तार जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मातीच्या इन्सुलेटरला तीव्र उन्हामुळे तडा गेला होता. त्यानंतर संबंधित इन्सुलेटर फुटल्याने वीज वाहिनीची तार तुटून खाली पडली आणि ही दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपअभियंता सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृत शेतकरी व जनावराच्या नुकसानभरपाईबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group