दौंडः येथे बुधवार दि. ७ रोजी पावणेबाराच्या सुमारास वादातून एका वृद्ध व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लकझ उर्फे कोब्या काळे रा. लासुर्णे ता. इंदापूर, जि. पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला होता. त्यावेळी फिर्यादी यांचे सासरे सुदाम आणि आरोपी लकझ यांच्यात वाद झाले. हा वाद टोकाला जावून लकझ याने त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने सुदाम यांना घायाळ केले. या घटनेत सुदाम यांचा मृत्यू झाला.
रहिना बाबूजी चव्हाण (वय २० रा. बोरवेल आंबेडकर नगर ता.दौंड जि. पुणे) यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या घरी नणंद व तिचा नवरा लकझ हे आले होते. बुधवार दि. ७ रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास लकझ उर्फे कोब्या काळे (रा. लासुर्णे ता. इंदापूर जि. पुणे) याची आणि फिर्यादी यांच्या सासऱ्यामध्ये वाद झाले. सासरे सुदाम हे लकझ याला बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचे बोलले. यावेळी लकझ याला राग अनावर झाला. त्यानंतर थेट लकझने सासरे सुदाम यांच्यावर त्याच्याजवळ असणाऱ्या चाकू छातीमध्ये भोकसला. ते रक्कबंबाळ झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास डॅाक्टरांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना दौंडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॅाक्टारांनी सुदाम यांना मयत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास गोसावी हे करीत आहेत.