भोर : नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटे यांनी खाते निहाय बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवार दि.६ रोजी घेतली. शहरातील विविध समस्यांची, नागरिकांच्या अडचणी याबद्दल व विकास कामांची माहिती घेतली. आढावा बैठकीत शहरातील नागरिकांना वारंवार येणाऱ्या अडीअडचणी माहिती घेत त्यांचे निवारण नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ करावे तसेच , अतिक्रमणे ताबडतोब हटवावीत अशा सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.
मुख्यत: भाटघर धरण पूर्णपणे शंभर टक्के भरले असतानासुद्धा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या आल्याचे सांगण्यात आले त्यामुळे संबंधित पाणी विभागाला नागरीकांना दररोज स्वच्छ पाणी कसे मिळेल अशा सूचना देण्यात आल्या . तसेच खाते निहाय आरोग्य, पाणी प्रश्न, कचरा व्यवस्थापन, वीज, अतिक्रमण याबाबत सखोल माहिती घेऊन संबंधित विभागांना अडचणी निवारण करण्याचे सांगण्यात आले.
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्रीराम पवार,माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी नगरसेवक सचिन हर्णसकर, गणेश पवार, जगदीश किरवे, समीर सागळे, अमित सागळे, सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर, गणेश मोहिते, अभिजीत सोनवणे, पवन भागने, पाणी विभाग खुराडे , महेंद्र बांदल, कॉन्ट्रॅक्टर नितीन ओव्हाळ आदींसह नगरपालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते