Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

by SBPRNL
June 15, 2026
मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

वेल्हे, ता. १४ : राजगड तालुक्यातील मालवली येथे किरकोळ वादातून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी १५ वर्षे १० महिने वयाच्या विधिसंघर्षित बालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

विकास सुरेश जाधव (वय १८, रा. मालवली, ता. राजगड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार (वय २३) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवली येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळ रविवारी दुपारी काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. उपस्थितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीने पुन्हा मैदानाजवळ जाण्याचा आग्रह धरला.

मैदान परिसरात परत आल्यानंतर विकास जाधव आणि आरोपी यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपीने विकासचा गळा दाबल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी दोघांना वेगळे केले. मात्र, त्यानंतर विकासची प्रकृती बिघडली. तो प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विकासला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत.

या घटनेमुळे मालवली परिसरात हळहळ व्यक्त होत असून युवकाच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आरोपी विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेहाचे शवविच्छेदन व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group