Friday, October 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

by SBPRNL
June 15, 2026
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नसरापूर, दि. १५ : खेड शिवापूर टोल नाक्याजवळ कर्तव्य बजावत असलेल्या राजगड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई प्रशांत ज्ञानेश्वर राऊत यांच्यावर दोन तरुणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना रविवारी (दि. १४) रात्री घडली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत राऊत हे खेड शिवापूर टोल नाक्यापुढील सर्व्हिस रोड परिसरात वाहतूक नियमन व बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत होते. रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास दोन युवक रस्त्यावर उभे राहून आरडाओरडा, शिवीगाळ आणि गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून राऊत यांनी संबंधितांना समजावून सांगत रस्त्यावर गोंधळ न घालण्याची सूचना केली.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

मात्र, पोलिसांनी समज दिल्याचा राग मनात धरून आरोपी अनिकेत राजेंद्र लांडे (वय २४, रा. तांभाड, ता. भोर) याने पोलिस शिपाई राऊत यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांच्या गणवेशाची गचांडी धरून गणवेशावरील बटणे तोडली. एवढ्यावरच न थांबता त्याने हातातील चावीने राऊत यांच्या हनुवटीवर वार करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसरा आरोपी शुभम शिंदे (रा. इंदिरानगर, हिंगणे, पुणे) याने मागून येत राऊत यांच्या डोक्याच्या मागील बाजूस विटेने मारहाण केली. या हल्ल्यात राऊत जखमी झाले असून त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर जखमी राऊत यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजगड पोलिसांनी त्वरित कारवाई करत अनिकेत लांडे याला अटक केली, तर शुभम शिंदे हा फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी पोलिस शिपाई प्रशांत राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास राजगड पोलिस ठाणे करीत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group