Monday, August 31, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

"शेतातील काम सांगितल्याचा राग इतका अनावर झाला की नातवानेच आजोबांचा जीव घेतला; शिरूर तालुका हादरला!"

by SBPRNL
June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

शिरूर : शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांचा लोखंडी गजाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. १५) सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दशरथ यशवंत राऊत (वय ८४) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून, सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय २६) असे आरोपी नातवाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजता दशरथ राऊत यांनी नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना केल्या. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात सोमनाथने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर जोरदार वार केले.

या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्यांनी लहानपणापासून नातवाला वाढवले, संस्कार दिले, त्याच आजोबांचा नातवाकडून झालेला दुर्दैवी अंत गावकऱ्यांना हादरवून गेला.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत काही तासांतच त्याला ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group