काठीपालखी, छबीना ,कुस्ती, बैलगाडा शर्यतीसह ,ऑर्केस्ट्रा असे विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम पैलवान प्रतिष्ठान व श्री वाघजाई देवी यात्रा कमिटीची माहिती
भोरचे – ग्रामदैवत वाघजाईदेवी( माघ पौर्णिमा )याञे निमित्ताने मंदिर ट्रस्टच्या वतीने बुधवार दि १२ ते शुक्रवार दि.१४ पर्यंत वाघजाईमाता देवीचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये श्री वाघजाई देवी ट्रस्ट, याञा कमिटी व पैलवान प्रतिष्ठानच्या वतीने काठी पालखी , देवीचा छबीना, कुस्त्यांचा जंगी आखाडा व भव्य बैलगाडा शर्यतीचे अशा धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे माजी नगरसेवक व गटनेते यशवंत डाळ, यांनी सांगितले. रविवारी (दि ९ ) नववा मंदिर वर्धापन दिन साजरा करत भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. तसेच या देवीच्या याञा उत्सवात १२ फेब्रुवारीला जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित केला असुन यामध्ये महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी सह नामांकित पैलवानाच्या कुस्त्यांसाठी पाच हजार ते साडे तीनलाखां पर्यंतचे जाहीर बक्षीस इनाम ठेवण्यात आले आहे.
यामध्ये मुख्य कुस्ती माजी नगरसेवक यशवंत डाळ यांच्या वतीने महाराष्ट्रात केसरी पै.पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्यात ३ लाख ५० हजार रु. इनामाची बक्षिसाची निकाली कुस्ती होणार आहे व मानाची गदा सरपंच गृप भोलावडे प्रवीण जगदाळे यांच्या वतीने दिली जाणार आहे. दुसरी कुस्ती जि.प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या वतीने २ लाख रु इनाम अनिकेत मांगडे विरुध्द आकाश रानवडे यांच्यात होणार असून , तिसरी कुस्ती आमदार शंकर मांडेकर यांच्या वतीने २ लाख ५१ हजार रु इनाम सतपाल सोनटक्के विरुध्द शिवा चव्हाण यांच्यात ,तर चौथी कुस्ती नगरविकास राज्यमंञी माधुरी मिसाळ यांच्या वतीने १ लाख ५१ हजार रु इनाम संग्राम साळुंके विरुध्द प्रसाद सस्ते यांच्यात तर पाचवी कुस्ती अनंत दुधचे संचालक नितिन थोपटे यांच्या वतीने १ लाख रु इनाम नामदेव कोकाटे यांच्या विरुध्द सुबोध पाटील यांच्यात होणार आहे. याशिवाय ५१ हजाराच्या ८ कुस्त्या, २५ हजाराच्या ११ कुस्त्या, ११ हजाराच्या १५ कुस्त्या, तर ५ हजाराच्या १५ कुस्त्या होणार आहेत.
१३ फेब्रुवारीला राञी ८ वा शेटे मैदानावर हिंदवी पाटील हिचा आर्केस्ट्रा ठेवण्यात आला आहे. दरम्यान १४ फेब्रुवारी वाघजाई माता केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भोरदरा येथे केले असुन आठ क्रमांक ठेवण्यात आले असुन सर्वाना २१००० हजाराचे बक्षिस व मानाची ढाल देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन यात्रा कमिटी यशवंत डाळ, संदीप शेटे, सोमनाथ ढवळे, एकनाथ रोमण , गणेश मोहिते, सागर मोरे, बाळासाहेब खुटवड, अनुप धोत्रे, राजेंद्र गुरव, अमित जाधव, ताराचंद चांदणे, रमेश किवळे, किसन कारळे , किसन चोरगे, सुरेश वालगुडे यांच्या वतीने करण्यात येत आहे