बारामतीः दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने अनेक पक्ष मोर्चेबांधणी लागले असून, उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहिला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभेसाठी जय पवार यांच्या नावाचे संकेते दिल्याचे समजते. अजित पवार सध्या पुण्यात जनसन्मान यात्रे निमित्त आल्याने त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच बारामतीमधून सात ते आठ वेळा निवडून आल्याने आता या जागेसाठी रस नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बारामती विधानसभेसाठी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा आता खुद्द अजित पवार यांनी संकेत दिल्यानंतर होताना दिसत आहे. “आता मला बारामती विधानसभा लढविण्यासाठी रस नाही, कारण मी तेथून सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे.” असे ते म्हणाले. तसेच जयच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते शिक्कामोर्तेब करतील. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची हे संसदीय मंडळ ठरवेल, असे देखील त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
शरद पवार गटाकडून योंगेद्र पवारांच्या नावाची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांच्या नावाची बारामती विधानसभेसाठी चर्चा होताना दिसत आहे. तसेच स्वःताह योगेंद्र हे देखील तालुक्यातील विविध भागात भेटी देत असून, नागरिकांशी संवाद साधत आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नावावर अंतरिम शिक्का मोर्तेब केला जाऊ शकतो.