Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

by SBPRNL
February 4, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

भोंगवली : पंचायत समिती भोंगवली गणात यंदाच्या निवडणुकीत संयमी, प्रामाणिक आणि समाजाशी सातत्याने जोडलेले नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती मिळताना दिसत आहे. दिखाऊ भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून गणेश निगडे यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले असून, “शब्दांपेक्षा काम महत्त्वाचे” या भूमिकेचे ते प्रतीक बनले आहेत.

संयमी स्वभाव, शांत वृत्ती आणि कामातून बोलण्याची शैली हीच गणेश निगडे यांची खरी ओळख आहे. त्यांनी कधीही आक्रमक राजकारणाचा मार्ग स्वीकारला नाही; उलट सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी थेट संवाद साधत, त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्यावर भर दिला. गावातील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, वीज समस्या, आरोग्य सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार आणि क्रीडा सुविधांसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती मतदारांना विशेष भावत आहे.

You might also like

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

भोंगवली गणातील विविध गावांमध्ये घेतलेल्या भेटी, घराघरातील संवाद आणि थेट संपर्कातून गणेश निगडे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद स्पष्टपणे जाणवतो आहे. तरुण, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे. “नेतृत्व म्हणजे माणुसकी” हा विचार त्यांनी केवळ बोलून नव्हे, तर कृतीतून दाखवून दिला असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत राजकारणातील दिखाऊपणा, ओव्हर कॉन्फिडन्स आणि आक्रमकतेपेक्षा विश्वासार्ह आणि कामाची शाश्वती देणाऱ्या नेतृत्वाला मतदारांचा कौल मिळताना दिसत आहे. त्यामुळेच “आमचा माणूस” म्हणून गणेश निगडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार अनेक मतदारांनी केला आहे.

विकास, विश्वास आणि एकनिष्ठतेच्या जोरावर भोंगवली गणात परिवर्तन घडवण्याची संधी गणेश निगडे यांना मिळावी, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. एकूणच भोंगवली गणातील राजकीय वातावरण पाहता, संयमी व समाजाभिमुख नेतृत्वाला स्पष्ट कौल मिळत असून, येणाऱ्या निवडणुकीत गणेश निगडे यांना निर्णायक विजय मिळेल, असा ठाम विश्वास मतदारांकडून व्यक्त केला जात आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
क्राईम

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
पुणे

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू
वेल्हे

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती
भोर

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली
ताज्या बातम्या

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच
दौंड

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
Next Post
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group