आई वडिलांचे स्वप्न केले पुर्ण , बसरापुर गावात झाला पहिला पोलीस
भोर पासून दोन कि मी अंतरावर असलेल्या बसरापुर (ता.भोर) येथील विशाल केशव साळुंके याने आपली घरची परिस्थिती बेताची असताना केवळ पोलिसात जाण्याची जिद्द व चिकाटी आणि खडतर प्रयत्नांच्या जोरावर पिंपरी चिंचवड पुणे येथे पोलीस भरतीची परिक्षा उत्तीर्ण होत पोलीस बनण्याची कामगिरी केली.
हर घर तिरंगा मोहिमेद्वारे आज १५ ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला. याच दिवशी विशालला सकाळी आपण उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर त्यास व त्याच्या आई वडीलांना आनंद अश्रू अनावर झाले.विशालने आमचे स्वप्न पूर्ण केले.दिवस रात्र अभ्यास व सराव केल्याने त्याच्या कष्टाचे चीज झाले. त्यास भोर पोलीस स्टेशनमधील अधिका-यांचे मार्गदर्शन लाभले असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यांनी सर्व गावात पेढे वाटून आपल्या मुलाचा आनंद साजरा केला.