भोर : नाविन्यपूर्ण उपक्रम प्रयत्न करत नुकताच 1 महिन्या पूर्वी पुणे जिल्ह्यातील पहिलं हर्बल (औषधी वनस्पती गार्डन) तयार केले होते. त्या पाठोपाठ आज प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली येथे 15 ऑगस्ट स्वातत्र्यं अमृत महोत्सव निम्मित भोंगवलीतील माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला व NQAS प्रोजेक्ट निम्मित भोंगवली आरोग्य केंद्रात चक्क जिन्यातील पायऱ्यांवर केलेले सुंदर आरोग्य दिनाचं महत्व सांगणाऱ्या चित्रीकरणाचे अनावरण सरपंच व ग्रामस्थ सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील पाहिलं हर्बल वनस्पती औषधी गार्डन मा सरपंच अरुण पवार विठ्ठल गायकवाड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ कापसीकर व पुणे जिल्हा कायाकल्प टीम अधिकारी सोनवणे पाहणी करताना
भोर तालुक्यातील प्राथमिक भोंगवली येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र अमृत महोत्सव निम्मित आरोग्य अधिकारी डॉ कापसीकर, अरुण पवार सरपंच यांचा हस्ते जिन्यातील पायऱ्यांवर आरोग्य दिन माहिती चित्रीकरण केल्याने त्या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच व माजी सैनिक व ग्रापंचायत सदस्य यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच या वेळी शाळेतील विद्यार्थी यांना शालेय वस्तू सुशांत मोहिते यांनी वाटप केल्या.
या प्रसंगी 108 च वैद्यकीय अधिकारी उत्कृष्ट प्रसूती आरोग्य सेवा बाबत विशेष सत्कार करण्यात आला. महावितरण मधील भिसे यांचा विद्युत सेवा दिल्याबद्दल ग्रामपंचायत व भोंगवली आरोग्य केंद्राच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ मेघा लोंढे, डॉ मंदार माळी, सुशांत मोहिते, आदर्श कनिष्ठ सहाय्यक श्री उमेश, डॉ तेजश्री कोकरे ,मनीषा कांबळे, कर्मचारी वाघोले सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच सरपंच अरुण पवार, उपसरपंच शेडगे, विठ्ठल गायकवाड ग्रामपंचात सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.