वाल्हे -(सिकंदर नदाफ) : राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील दौंडज गावच्या सरपंचपदी अलका महादेव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दौंडज ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सीमा भुजबळ यांच्या मनमानी कारभारामुळे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव नुकताच दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर दौंडज ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.यामध्ये ग्रामपंचायत सदस्य अनुजा कदम यांनी सरपंच पदासाठी अलका माने यांचे नाव सुचविले .त्याला अर्चना भोसले यांनी अनुमोदन देऊन उर्वरित ग्रामपंचायत सदस्यांनी देखील पाठिंबा दिल्याने अलका माने यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी बापूसाहेब देवकर यांनी दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच अलका माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बालाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयवंत जाधव यांसह लालासाहेब माने, तेजस दगडे पांडुरंग दगडे, विजय फाळके, सचिन इंदलकर, महादेव माने, उपसरपंच अनुजा कदम, तसेच मनोज कदम तुषार बांदल, नारायण बरकडे, किसन माने, प्रा. मंदा माने, अमोल कदम, प्रभाकर घोगरे, बाबा कदम, सुनिल जाधव,शिवसेना निरा गण प्रमुख राहुल दगडे उपस्थित होते.