भोरः भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदरची विकासकामे ही डोंगरी विकास विभागाअंतर्गत २०२४-२५ साठी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंजूर झालेली विकास कामे खालीलप्रमाणे
भोर तालुका
बसरापूर आनंदवाडी, राजिवडी शिळींब आणि साळव या ठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एकूण मिळून १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वेल्हा(राजगड)
गव्हंडे, टेकपोळे, बार्शिमाळ, मेटपिलावरे, लव्ही बु., लाशिरगाव कातुर्डेवाडी, या सर्व सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एकूण मिळून ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मुळशी
दासवे रामनगर, पिंपलोळी, मुळशी खु., वेगरे, सालतर, होतले या सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एकूण मिळून ३५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.