Sunday, November 1, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

कुरुंजाई देवीच्या सेवेत आयुष्य व्यतीत करणाऱ्या मालन शिळीमकर यांची वयाच्या ८२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली; सोमवारी अंत्यसंस्कार

by SBPRNL
November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

नसरापूर, ता. २५ (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथील जिल्हाभर प्रसिद्ध असलेल्या श्री कुरुंजाई देवीचे निस्सीम भक्त तथा कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा आनंदराव शिळीमकर यांच्या मातोश्री श्रीमती मालन आनंदराव शिळीमकर (वय ८२) यांचे रविवारी (ता. २५) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिळीमकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुरुंगवडी परिसरासह कुरुंजाई देवीच्या भाविकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

श्री कुरुंजाई देवीचे प्रथम भक्त आनंदराव शिळीमकर यांच्या पत्नी म्हणून मालन शिळीमकर यांनी संसाराची जबाबदारी सांभाळतानाच देवीच्या सेवेतही मोलाचे योगदान दिले. पतीच्या धार्मिक कार्यात त्यांनी नेहमीच खंबीर साथ दिली. कुरुंजाई देवीच्या दर्शनासाठी विविध भागांतून येणाऱ्या भाविकांचे त्या अत्यंत प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने स्वागत करत असत. भाविकांचे आदरातिथ्य करणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि देवीच्या सेवेत स्वतःला वाहून घेणे, हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता.

You might also like

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, धार्मिक श्रद्धा आणि सेवाभावी वृत्ती यामुळे त्यांनी कुटुंबीयांसह भाविकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. कुरुंजाई देवीच्या भक्तीची परंपरा जोपासण्यात शिळीमकर कुटुंबीयांचे योगदान राहिले असून, या धार्मिक वाटचालीत मालन शिळीमकर यांचाही महत्त्वाचा सहभाग होता.

गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर रविवारी (ता. २५) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि भाविकांकडून शोकभावना व्यक्त करण्यात येत आहेत.

त्यांच्या पश्चात कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर, ट्रस्टचे सचिव विजय शिळीमकर हे दोन पुत्र, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सोमवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार

मालन आनंदराव शिळीमकर यांच्या पार्थिवावर सोमवार (ता. २६) रोजी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक, ग्रामस्थ आणि कुरुंजाई देवीच्या भाविकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांच्या निधनाने शिळीमकर कुटुंबातील ज्येष्ठ आणि धार्मिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
Next Post
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group