Saturday, November 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

महिन्याला लाखोंच्या कथित आर्थिक व्यवहारांची चर्चा; स्विफ्ट डिझायरच्या फेऱ्या, मालमत्ता आणि ३५ लाख रुपये गुंठ्याच्या प्लॉटची चर्चा!

by SBPRNL
November 1, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर |भोर उपविभागातील कथित अवैध धंदे आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या आर्थिक साखळीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भोर, राजगड, सासवड आणि जेजुरी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, मटका, अवैध दारूविक्रीसह अन्य बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. या व्यवसायांमागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, कथित आर्थिक व्यवहार कोणामार्फत होतात आणि या साखळीतील पुढील दुवे कोणते, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

महिन्याला लाखोंच्या कथित व्यवहारांची चर्चा!

You might also like

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

उपविभागीय पोलीस कार्यालयाशी संबंधित एका कर्मचाऱ्याच्या कथित आर्थिक व्यवहारांबाबत परिसरात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित कर्मचारी स्विफ्ट डिझायर कारमधून विविध ठिकाणी वारंवार जात असल्याची चर्चा असून, या फेऱ्यांचा नेमका उद्देश काय, याची चौकशी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित कर्मचाऱ्याला दरमहा दोन ते तीन लाख रुपये कमिशन मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने नऊ ते दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप स्वतंत्र पुराव्यांची पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या आरोपांची अधिकृत पडताळणी आवश्यक आहे.

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कथित कलेक्शन?

चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दरमहा सुमारे दहा लाख रुपयांचे कथित कलेक्शन होत असल्याचा दावा केला जात आहे. हा पैसा कोण गोळा करतो, त्याचे वितरण कोणाकडे होते आणि या व्यवहारांमध्ये कोणाचा सहभाग आहे, हे तपासातून स्पष्ट होणे गरजेचे आहे.

३५ लाख रुपये गुंठ्याच्या प्लॉटची चर्चा!

संबंधित कर्मचाऱ्याच्या नावावर किंवा संबंधित व्यक्तींशी निगडित मालमत्तांबाबतही चर्चा सुरू आहे. तालुक्यात विविध ठिकाणी मालमत्ता असल्याचे दावे केले जात असून, ३५ लाख रुपये प्रति गुंठा किमतीच्या प्लॉटचा मुद्दाही चर्चेत आहे. या मालमत्तेची मालकी, खरेदीची कागदपत्रे आणि निधीचा स्रोत यांची कायदेशीर चौकशी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.

वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का?

या कथित आर्थिक साखळीची स्वतंत्र चौकशी होणार का? संबंधित कर्मचाऱ्याची बाजू जाणून घेतली जाणार का? चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

क्रमशः

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प
पुणे

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

Next Post
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group