भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण मिळून ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ लाख २३ हजार ३५६ इतकी असून, महिला मतदार १ लाख ९८ हजार १९१ असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात आणि अप्पर तहसिलदार पूनम अहिरे यांनी दिली.
तसेच मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ हजार कर्मचारी लागणार असून, राखीव ५०० कर्मचारी, ३५०० कर्मचारी आणि ७० झोनल अॅाफिसरची आवश्यकता असणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच टप्यात निवडणूक होणार असल्याने २२ आँक्टोबर ते २९ आँक्टोबर सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्विकारले जातील. प्राप्त अर्जांची छाननी ३० अॅाक्टोबरला होईल तसेच चिन्ह वाटप त्याच दिवशी असणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
इतकी आहेत मतदान केंद्रे
मतदान केंद्रांची एकूण संख्या ५६४ इतकी असून, भोर २४०, वेल्हे ९६, मुळशी ३१८ केंद्र आहेत. तर १५०० पेक्षा अधिक मतदान असणारे एकही नाही. शहरी ५४ तर ग्रामीण ५०० मतदान केंद्र आहेत. सर्वात लहान बुरुडमाळ येथे ४० मतदार आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
उमेदवारांचे अर्ज भोर तहसिल कार्यालयातच घेतले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी नवसह्याद्री महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले जाणार आहे. इव्हीएमचे प्रशिक्षण आयटीआयला घेतले जाणार आहे. स्टाँगारुम आयटीआयला साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पानशेत, वेल्हे, भोर, मुळशी मतमोजणी आयटीआय भोर येथेच होणार आहे. राज्यात आर्दश आचार संहिता लागू झाली आहे. २४ तास ९ एसएसटी ९ हँडा स्काँड राहतील. तीन तालुक्यांत बीडीओ असणार आहे. आचार संहिता प्रमुख नेमले आहेत. एक खिडकी योजनेतून अर्ज घेऊन परवानगी दिली जाणार आहे.
अशी असणार आहे मतदान केंद्रावर सुविधा
मतदार केंद्रावर बाथरुम, रँम्प अपंगांना खुर्ची दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेजवळ सावलीची सोय केली जाणार आहे. अधिक केंद्र असल्यास खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. टपाली मतपत्रिका सुविधा असणार आहे. पोलीस, होमगार्ड, एसटी बसचालक व मतदान कर्मचारी यांच्यासाठी पोस्टल मतदान सुविधा दिली जाणार आहे. ते मतदान केंद्रावरच मतदान करतील. मुळशी तालुक्यात सोसायटीमध्ये मतदान सुविधा करुन दिल्या आहेत. बावधन, हिंजवडी ५ सोसायटींसाठी ६ मतदान केंद्र केली आहे.
मतदानात वाढ व्हावी म्हणून……
मतदानात वाढ व्हावी म्हणून सोसायटी मतदान केंद्र स्थापन केली आहेत. मतपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. १३ पुराव्यांपैकी एक पुरावा दिला, तरच मतदान करता येणार आहे. महिला मतदान कर्मचारी ज्या त्या मतदार संघात काम करतील.
अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया अशी असणार आहे
अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ अॅाक्टोबर सकाळी ११ ते ३ ही वेळ असणार आहे. राजकीय पक्षांना सुचक लागतो. इतराना १० सुचक लागतात. एकाला चार अर्ज भरता येतील. राजकीय पक्षांनी ३ वाजेपर्यंत बी फार्म देणे गरजेचे आहे. तर अॅफिडेव्हिट शेवटच्या दिवसापर्यंत द्यावे. १० हजार डिपाँझीज असून, ते आधी भरावे लागणार आहे. शपथ पत्रासाठी ५०० रु द्यावे लागणार आहे. तसेच खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यासाठीची मर्यादा ४० लाख रुपये आहे. अर्ज २२ अॅाक्टोंबरपासून विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरायला मदत करणार अॅानलाईन अर्ज निवडणूक आयोगाने दिलेल्या अॅपवर भरावा आणी प्रिंट काढून निवडणूक अधिकारी यांच्याकडे २९ तारेखेपच्या ३ वाजेपर्यंत जमा करावा लागणार आहे.