रविंद्र सोपान कोंढाळकर व अनंत मारूती कदम यांच्याकडून गरजूंना मदत
भोरच्या दुर्गम भागातील राजा रघुनाथरावच्या आपटी माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना भोर येथील उद्योजक रविंद्र सोपान कोंढाळकर व प्राध्यापक अनंत मारूती कदम यांनी आपटी येथील माध्यमिक विद्यालयातील गरीब, गरजूं २० विद्यार्थी, विद्यार्थीना गणवेश वाटप करण्यात आले. यावर्षीही विद्यालयात हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
सदर गणवेश अनंत कदम व विद्यालयातील शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा भागवत, शिक्षक संकेत वाडकर, वैशाली मांगडे, राखी शिंदे,प्रा.आनंदेसर , कर्मचारी अनिल नांदे ,सुदामा पारठे व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच एक हात मदतीचा पुढे करत गरजूंना मदत करत असतो वि विद्यार्थ्यांनीही आपली शैक्षणिक गुणवत्ता दाखवत भविष्यात प्रगती करत आपले नाव उज्वल करावे असे प्रतिपादन अनंत कदम यांनी यावेळी केले.