रस्ता बंदमुळे छोट्या व्यावसायिकदारांसह, प्रवासी वाहतूकदारांचे आर्थिक नूकसान
भोर – तालुक्यातील देवस्थान मांढरदेवी घाट रस्ता मागील गेली ६ महिन्यांपासून नुतनीकरण, रूंदीकरण व दुरुस्तीसाठी वाहतूकसाठी बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील व्यवसाय काही दिवसांपासून बंद आहेत. छोटे -मोठे व्यावसायिकदार, प्रवासी वाहतूकदार ,पर्यटक, शालेय विद्यार्थी तसेच पर्यटनावर अवलंबून असणारे हॉटेल व्यावसायिक वाहतूक बंद मुळे मोठ्या त्रासाला व आर्थिक नूकसानीला सामोरे जावे लागत आहे.
व्यावसायिक व स्थानिक उद्योजक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा घाट रस्ता वाहतूकसाठी खुला करण्याचे आवाहन भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे पाटील यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देऊन करण्यात आले. यावेळी भोर तालूका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, वाहतूक संघनटनेचे पदाधिकारी संतोष शिवतरे ,अंतोबा सावले, साळुंखे उपस्थित होते.