नदीकिनारी, माळरानावर, फार्म हाऊसवर, हॉटेलवर सेलिब्रेशन करणा-यांवर पोलीसांची करडी नजर; धांगडधिंगा घालण-या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यपींचा बंदोबस्त करणार
भोर – नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्रच मोठा जल्लोष उत्साह असतो.या जल्लोषाच्या आनंद घेताना धांगडधिंगा, धूमाकूळ, धुडगूस घालणा-या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलीसांची करडी नजर असणार असून नववर्षाचे स्वागत करताना भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणताही बेकायदेशीर, नियमबाह्य अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही, नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कायदेशीर मार्गाने अशांचा बंदोबस्त केला जाईल असे भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांनी हद्दीत पेट्रोलियम करताना सांगितले.
अलिकडच्या काळात नववर्षाची पूर्वसंध्या, खरंतर रात्र म्हणजेच ३१ डिसेंबरची रात्र ही जागरण करून नव्या वर्षाचे स्वागत करायची पद्धत सर्रास रूजली आहे. नदीकिनारी , माळरानावर, फार्म हाऊसवर, हॉटेलवर शाकाहारी , मांसाहारी जेवणाचा बेत आखून गाणी गाऊन , वाजवून, नाचणे, पेयपान करणे, फटाके उडवुन, दिव्यांची रोषणाई करत, आनंदाने बेहोषपणे नववर्षाचे सेलिब्रेशन करत आहेत . हेच स्वागत करताना खास करून मद्यपान करणा-या तळीरामांवर पोलीसांची कटाक्षाने करडी नजर असणार आहेत.नदीकिनारी, माळरानावर, फार्म हाऊसवर थर्टी फर्स्ट साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई होणार आहे.अमलीपदार्थांना बंदी असुन शहरात हॉटेल मालक ,बारमालकांनी आणि गावपातळीवर सरपंच,पोलीस पाटील, पोलीस मित्र,ग्रामसुरक्षादल यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे बसरापुर येथे नदीकिनारी रात्री पेट्रोलियम करताना पवार यांनी सांगितले.यावेळी होमगार्ड भिमराव रणखांबे, संदेश गोळे, पोलीस कर्मचारी गावचे पोलीस पाटील विठ्ठल झांजले, संतोष झांजले, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले ,माजी सरपंच रमेश झांजले,पोलीस मित्र केशव साळुंके उपस्थित होते