विशाळगडासह सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करावे आणि हिंदूंवरील गुन्हे मागे घेण्यात यासाठी मूक आंदोलन
विशाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावेत आणि हिंदूंवर ,मावळ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शनिवारी (दि. ०३) शिवतीर्थ चौपाटी भोर येथे येथे मूक आंदोलन घेण्यात आले यावेळी . समितीचे विश्वजीत चव्हाण यांनी मूक निदर्शन आंदोलनाचा उद्देश सांगितला. आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते हार घालून करण्यात आली. यावेळी भोर व्यापारी संघटनेचे अमोल शहा, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे , धारकरी राहुल शिंदे, धारकरी साळुंखे, राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक काकासाहेब कोरे, सनातन संस्थेचे प्राध्यापक विठ्ठल जाधव, समितीचे श्रीकांत बोराटे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही धर्माभिमानी आंदोलनाच्या येथून चालले होते, आंदोलन विषय पाहिल्यावर स्वतः हुन आंदोलनामधे सहभागी झाले. ये जा करणारे वाहने थांबून विषय पाहत होते आणि सकारात्मक प्रतिसाद देत होते.छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळे यांनी प्राणाचे बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करून धर्मरक्षण केले आज त्याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत, विशाळगडसह सर्वच गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यात यावे आणि हिंदूंवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे विश्वजीत चव्हाण यांनी यावेळी केली.भर पावसातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.