अतिवृष्टीमुळे पाणी वाढल्याने नदीच्या पात्रात भाटघर धरणातून मोठा विसर्ग सुरू
भोर लाईव्ह राजगड न्यूज :- सध्या तालुक्यात घाटमाट्यासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने भोर- पुणे महामार्गावर असणारा हारताळी येथील पूल मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाण्याखाली गेल्याने सध्या तात्पुरता स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सध्या धरण्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.धरणातुन २२ हजार क्युससने विसर्ग सोडण्यात आला असून सदरील नदीपात्रातील गावांना तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सदरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्याने हा पूल वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.