Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणेः दुजाभाव? भाजपप्रणित मतदार संघातील आमदारांसाठी निधीची खैरात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निधी नाही?

राज्य शासनाकडून महापालिकेला २०० कोटींचा निधी मंजूर; निधी वाटपावरुन वाद उफाळून येण्याची शक्यता

by SBPRNL
August 31, 2024

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे 

भाजपेने सत्ताधारी शहरातील नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेने मंजूर केलेला २०० कोटी रुपयांचा निधी भाजपचे आमदार असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात या निधीतील एक रुपया देखील देण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९ पूर्वी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख नाला असलेल्या आंबिल ओढ्याला पूर आला होता. पुराचे पाणी अनेक सोसायट्यांमध्ये घुसले. तर काही सोसायट्यांच्या सीमा भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. त्यामुळे नाल्यांना येणारा पूर रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे आवश्‍यक असल्याने महापालिकेने काही ठिकाणी भिंती बांधल्या, तर काही भागात पूल बांधले. इतर भागात तांत्रिक कारणामुळे पालिकेला हे काम करता आले नाही. हे काम करता यावे यासाठी राज्य सरकारने विशेष निधी म्हणून २०० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिलेला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भाजपप्रणित मतदार संघातील आमदारांसाठी निधीची खैरात 

या कामांची निविदा काढताना महापालिका प्रशासनाने भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातील कामांची यादी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली आहे. यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी ४१.२३ कोटी, शिवाजीनगरसाठी २४.८० कोटी, पर्वतीसाठी ४१.१५ कोटी, कोथरूडसाठी १९.९० कोटी,  कॅन्टोंन्मेंट मतदारसंघासाठी ३९.०४ कोटी रुपयांची निविदा काढली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निधी नाही?

महायुतीत एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या वडगावशेरी, हडपसर तसेच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी देण्यात आलेला नाही. अशी माहिती मिळत आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून याला प्रशासकीय मान्यता घेतली आहे. यामुळे आता या निधीवाटपवरुन वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags: bjpncpPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव
भोर

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

August 28, 2025
प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे
भोर

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

July 20, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
Next Post
सासवडः बुलेट-कारची समोरासमोर जोराची धडक; अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी

दुःखदः १६ वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने टेम्पो दिला पेटवून; निरा-मोरगाव रस्त्यावरील घटना

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group