निराः निरा-मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती येथे निरा नदीच्या डाव्या कालव्याजवळ आशयर टेम्पोने एका १६ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये इजाज खुर्शिद सय्यदा (वय १६ वर्ष रा. पोकळे वस्ती) या मुलाचा जागीच मूत्यू झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने हा टेम्पो पेटवून दिला आहे.
इजाज हा सायकलवरुन जात असताना मागून आलेल्या आयशर टेम्पोने त्याला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या टम्पोचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा अपघातमाध्ये जागीच मूत्यू झाला आहे. धडक देणाऱ्या टेम्पोचा चालक गुळंचे गावाच्या दिशेने पळून जात असताना त्याला ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले. अमरजित भागवत बोकारे रा. लातूर असे टेम्पो चालकाचे नाव असून, या घटनेचा अधिक तपास कंरजे पोलीस करीत आहेत.