Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे कापूरहोळ येथे जल्लोषात स्वागत

by Team Rajgad Publication
July 20, 2025
प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

नसरापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे शनिवारी (दि. १९ जुलै) पुणे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर कापूरहोळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या पक्षनियुक्तीचा उत्सव कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर साताऱ्याकडे जाणारा माझा प्रवास एक वेगळाच अनुभव ठरला, असे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. “या प्रवासात पुण्यातून जात असताना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पुणेकर जनतेने मनःपूर्वक स्वागत व सन्मान केला. हा सन्मान केवळ माझा नसून, आपल्या सर्वांचा आहे – ज्यांनी पक्षाचे विचार निष्ठेने जपले, संघर्षात साथ दिली आणि संघटनेला बळकट केले. आपण दिलेला सन्मान आणि आशीर्वाद मला माझ्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी निश्चितच प्रेरणा देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

You might also like

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

विकास कामांचा शुभारंभः सारोळे येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ७७ लाखांची तरतूद

कापूरहोळ येथे भोर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळून आणि पुष्पहारांनी शिंदे यांचे स्वागत करताना दिसले. यावेळी रविंद्र बांदल, मानसिंगबाबा धुमाळ, संदीप नांगरे, विठ्ठल शिंदे, गणेश खुटवड, भरत बोबडे, माऊली कोंडे, शुभांगी जायकर , आनंद दळवी, पार्थ रावळ, गणेश बागल यांसह तालुका व स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, “सन्मान सोहळ्यात पुणे ते शिरवळ परिसरातील ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी, विविध विभागांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या डोळ्यांतील विश्वास, प्रेम आणि अपेक्षा मी स्पष्टपणे पाहिल्या. तोच विश्वास पुढे नेत, मी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो.”

कापूरहोळ येथील स्वागतानंतर आ. शिंदे हे सातारा दिशेने रवाना झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Tags: Mlashshikantshindencp
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी
ताज्या बातम्या

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

October 23, 2024
Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी
ताज्या बातम्या

Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

October 16, 2024
विकास कामांचा शुभारंभः सारोळे येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ७७ लाखांची तरतूद
ताज्या बातम्या

विकास कामांचा शुभारंभः सारोळे येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ७७ लाखांची तरतूद

October 14, 2024
भोर विधानसभा क्षेत्रात रंगलाय विकास कामांवरून ‘श्रेयवाद’; रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे थोपटेंकडून खंडण, म्हणाले….. माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं
ताज्या बातम्या

भोर विधानसभा क्षेत्रात रंगलाय विकास कामांवरून ‘श्रेयवाद’; रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे थोपटेंकडून खंडण, म्हणाले….. माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं

October 5, 2024
ताज्या बातम्या

भोरचे राजकारणः “नेते मंडळींनो श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील मूळ प्रश्नांवर पडदा”: नागरिकांचा सवाल

September 23, 2024
पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ
ताज्या बातम्या

पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ

September 9, 2024
Next Post
आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us