भोरः तालुक्यातील एका गावात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने जर कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी पीडित मुलीला दिली असल्याची माहिती आहे. ही घटना आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अनिल मोहन घोगरे वय २२ किनार सोंडे ता. वेल्हा जि. पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सदर कुटुंब एका झोपडीमध्ये राहते. या वस्तीमध्ये एका व्यक्तीकडे आरोपी घोगरे आला होता. त्याच्याशी ओळख झाली, तेव्हापासून तो सारखा माझ्याकडे इशारा करुन बोलावत होता. परंतु पीडित मुलगी त्याचेकडे गेली नाही, असे फिर्यादीमध्ये पीडित मुलीने सांगितले. दि. ०६ रोजी घरातील सर्वजण जेवन करुन झोपडीमध्ये झोपले. त्यानंतर दि. ७ रोजीच्या पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली तेव्हा त्यांच्या मुलगी तिथे नव्हती. त्यावेळी या मुलीचा आजुबाजुला शोध घेण्यात आला. वस्तीजवळ असलेल्या डोंगराच्या बाजूने पीडित मुलगी ओक्साबोशी रडत आली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. त्यानंतर पीडित्याच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे.
अशी घडली घटना
इकडे ये असा आवाज देवून मला बोलावले व म्हणाला की, मला तु खुप आवडतेस, तुझ्यासोबत बोलायचे आहे. माझ्या सोबत चल असे तो म्हणाला. त्यावेळी मुलीने येणार नाही असे सांगितले. तेव्हा मुलीचा हात पकडून नराधमाने तिला ओढत डोंगराच्या बाजुला घेवून नेऊन तिच्यावर अत्याचर केला. तसेच जर ही गोष्टी कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने मुलीला दिली होती. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने माणसात इतकी हिंसा येते कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.