Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

व्हायरल बातमीने खळबळः बातमी धादांत खोटी; आमच्या रक्तातच काँग्रेस, वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणारः शैलेश सोनवणे

by SBPRNL
November 16, 2024
व्हायरल बातमीने खळबळः बातमी धादांत खोटी; आमच्या रक्तातच काँग्रेस, वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणारः शैलेश सोनवणे

भोरः सोशल मीडियावर एक बातमी कम पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले होते. बातमी होती थोपटे यांच्या विरोधात भोर काँग्रेसमध्ये मतभेत अनेक कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बातमीने भोरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवून दिली. या बातमीत आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या एकाधिकाशाहीला कार्यकर्ते कंटाळले असून, अनेकजण काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मा. सभापती विठ्ठल आवाळे, शैलेश सोनवणे हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत, असा उल्लेख होता. या प्रकरणी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रसारित करण्यात आलेली बातमी कम पोस्ट चुकीची असून, तसे काहीही झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या प्रकरणी व्यक्तीगत बदनामी केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील आवाळे आणि सोनवणे यांनी सांगितले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

या प्रकरणी बोलताना मा. सभापती विठ्ठल आवाळे म्हणाले, माझी ओळख ही प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होता. आयत करून उमेदवारी दिलेली मंडळी आहेत, लोकांवर त्यांना लादले जात आहे. पुढारी जरी त्यांना गावांगावांत जाऊन फिरवत असले तरी लोकं त्यांना स्विकारत नसल्याने त्याची सल त्यांच्या मनात असल्याने गैरप्रकार करण्याचे ठरविले आहे. या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच बातमीत संग्राम थोपटे यांच्या पुत्र पृथ्वीराज थोपटे हे कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरत असल्याचे देखील खोटे असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. येत्या १८ तारेखेला देशाचे नेते शरद पवार आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि आघाडीतील नेते यांची संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडणार आहे. यामुळे त्याचा विरोधकांना बसला आहे. सदर बातमीने व्यक्तीगत बदनामी झाली असल्याने याची दखल घेत अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शैलेश सोनवणे म्हणाले.

बातमीची विश्वासर्हता ढासळली

कोणतीही बातमी देत असताना त्या बातमीत तथ्याचा विचार केला जातो. जर तथ्थ असेल तरच बातमी प्रसारित करण्यात येते. मोठ्या प्रमाणावर सध्याच्या घडीला सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. सोशल मीडियाच्या आधारावार बातम्यांचा सुळसुळाट पाहिला मिळत आहे. या बातमीने ती गोष्ट प्रकाशत आली आहे. यासंबंधीची बातमी कम पोस्टमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण या बातमीत नावे असणाऱ्यांनी दिल्याने असा भिंत मागून खोट्या बातमीत प्रसारित करण्याचा डाव प्रकाशझोतात आला आहे. यामुळे बातमीचा विश्वासर्हता या बातमीने ढासळली असल्याचे म्हणावे लागत आहे.

Tags: Bhorfakenewsmlasangramthopaterajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगती; कार्यकर्त्यांची मोट शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगती; कार्यकर्त्यांची मोट शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group