Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वारे निवडणुकीचेः उमेदवार कोणीही असो काम ‘एकदिलाने’ करणार; भोर महायुतीच्या पत्रकार परिषदेत निर्धार

पत्रकार परिषदेला किरण दगडे आणि बाळासाहेब चांदेरे यांची दांडी; महायुतीने केलेल्या कामांचे सादर केले रिपोर्ट कार्ड, भोरच्या जनतेला केले आवाहन

by Team Rajgad Publication
October 21, 2024
वारे निवडणुकीचेः उमेदवार कोणीही असो काम ‘एकदिलाने’ करणार; भोर महायुतीच्या पत्रकार परिषदेत निर्धार

भोरः  नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या २ वर्षांतील महायुतीचे रिपोर्टाकार्ड सर्वांसमोर मांडले. याच धरतीवर भोर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या घटक पक्षातील नेते मंडळीनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा संक्षिप्त स्वरुपात मांडला. यामध्ये राज्यात घेण्यात आलेल्या निर्णय, प्रकल्प, योजना आदी गोष्टींची माहिती देण्यात आली. तसेच महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचे काम एकदिलाने करणार असल्याचा निर्धार पत्रकार परिषद घेत करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित शिवतरे यांनी सरकाने राबलेले विविध प्रकल्प आणि योजना या विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना सामावून सरकारने निर्णय घेतले असून, लाडकी बहीण योजनाचा फायदा महिलांना झाला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. महायुती पञकार परिषद शिवरे ता भोर येथील हॅाटेल रामकृष्ण येथे झाली. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, कुलदीप कोंडे, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, जीवन कोंडे, अमोल पांगारे, प्रकाश तनपुरे, विकास चव्हाण, बाळासाहेब जायगुडे, दिपक बर्डे, प्रशांत दानवले, राजेंद्र वाघ, दिपक करंजावणे, राजेंद्र रेणुसे, सुधीर शेडगे, किरण राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे प्रस्ताविक भाजपाचे भोर तालुकाध्यक्ष यशवंत डाळ, नितिन सोनावले, कुनाल धुमाळ यांनी केले.

तुम्ही निवडणुका आल्यावर बोलता..

चांगलं काम झालं ते माझ्यामुळे नाही झालं तर दुसऱ्यामुळे असे सध्या चालू आहे. १५ वर्षांत सत्ता असून देखील काहीही झाले नाही. भोरच्या एमआडीसीबाबात ते म्हणतात विरोधक विरोध दर्शवित आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं का, असा सवाल रणजित शिवतरे यांनी केला. विरोध झाला म्हणून सांगायचं १५ वर्ष सत्ता असून तसेच संधी मिळून देखील भोर एमआयडीसीचा प्रश्ना का सुडविता आला नाही, असा प्रश्न शिवतरे यांनी उपस्थित केला. यामुळे तुम्ही भरकटत आहे, त्यामुळे विकासकामांबाबात बोला असे ते म्हणाले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

महायुती म्हणून आम्ही ‘एकत्र’

महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत हा संदेश भोरच्या जनतेमध्ये जावा, यासाठी ही पत्रकार परिषदेत घेतली असल्याचे कुलदीप कोंडी यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेमध्ये किरण दगडे आणि बाळासाहेब चांदेरे हे उपस्थित नसले तरी ते महायुतीसोबत असल्याची माहिती कोंडे यांनी दिली. सध्या धडफड तडफड सुरू आहे, ती जर कामात दाखवली असती तर चित्र वेगळे असते असा टोला कोंडे यांनी लगावला. सध्या महायुतीचे काम बोलत आहे. निधी मिळत नाही म्हणून आंदोलन करायचे आणि त्याच निधीची विकासकामे करून कार्यक्रम घ्यायचे असा आरोप त्यांनी विद्यामान आमदारांवर केला.

भोरची परिस्थिती आहेत तशीच…!

भोरचे एक दोन रस्ते सोडले तर आहे तशीच परिस्थिती असल्याचे भाजपचे शरद ढमाले म्हणाले. १५ वर्षं झाली आहेत, मंत्रीपद, अध्यक्ष आदी मिळणार अशी चर्चा केली जाते तुम्ही काय पण व्हाल पण भोरच्या जनतेमध्ये काय बद्दल झाला असा खोचक सवाल ढमाले यांनी थोपटे यांना केला. तसेच सध्या जनेतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

Tags: Bhormahayutirajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor- रस्ता सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय,भोरला प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातुन जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group