Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप; समाजातील बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजेः थोपटे

तालुक्यातील सरकारी आणि खाजगी जमीनीवर राहत असलेल्या कातकरी समाजातील बांधवाच्या नावाची नोंद सातबऱ्यावर करण्याची केली मागणी

by Team Rajgad Publication
October 5, 2024
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप; समाजातील बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजेः थोपटे

भोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अनंतराव थोपटे कॅालेज येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मेळाव्याला मोठ्या संख्येने कातकरी आदिवासी समाजातील महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी थोपटे यांनी या समाजातील बांधवांना ते राहत असलेल्या जागीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद करण्यात यावी, ही प्रमुख मागणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला भोरचे उपविभागीय अधिकारी डॅा. विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, प्रकल्प अधिकारी घोडेगाव प्रदिप देसाई, पोलीस निरीक्षक अण्णा पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष केळकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आनंदराव आंबवले, सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी तालुक्यात विविध ठिकाणी या समाजाचे कार्यक्रम होत आहेत. तसेच मेळाव्याचे देखील आयोजन केले जात आहे. हा समाज दिवसभर भटकंती करणारा समाज आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज काबाडकष्ट करीत असतो. मुळशी तालुक्यात कातकरी समाजाची संख्या अधिक असून, त्यानंतर भोर आणि वेल्हा (राजगड) मध्ये असल्याचे थोपटे यांनी सांगितले.

कातकरी समाजातील बांधवांना हक्काचे घर मिळाले पाहिजेः आ. संग्राम थोपटे 

या समाजातील बांधवांना राहण्यासाठी त्यांचे हक्काचे घर मिळायला पाहिजे. तालुक्यात सरकारी जमिनीत राहणाऱ्या कातकरी बांधवांच्या नावाची नोंद सातबाऱ्यामध्ये झाली पाहिजे. तसेच खाजगी जागेत राहणाऱ्या समाजातील बांधवांचे पंचनामे करुन सातबाऱ्यावर नोंद करुन त्या सातबारा कागदाचा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात यावा, अशी मागणी थोपटे यांनी यावेळी केली. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुलचा लाभ या शेवटच्या घटकापर्यंत मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.

Tags: BhormlasangramthopateMulshirajgadnewsVelha
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

बारामतीमधील दांडियाचा कार्यक्रम बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाडला बंद? घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी केला पोस्ट, पोलिसांना कारवाई करण्याची केली मागणी

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group