Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

by SBPRNL
October 28, 2024
गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी जनता ही केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून सदैव माझ्यासोबत राहिली आणि यापुढेही माझ्या पाठीमागे भक्कम उभी राहील याची मला पूर्ण खात्री असल्याचा ठाम विश्वास संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

तसेच आपण आजवर दिलेल्या आशीर्वादामुळेच या भागातील अनेक छोटे-मोठे महत्त्वाचे रस्ते, पूल, सभा मंडप, शाळा इमारती, समाजमंदिर, पाणीपुरवठा योजना, या कामासाठी निधी उपलब्ध करून देता आला असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर बावधन येथे प्रांत कार्यालय व पौड येथे तहसिल कार्यालय निधी उपलब्ध केल्याने सर्वसामान्य जनतेची काम लवकर मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भरे येथील क्रीडा संकुलही उभारण्यासाठी निधी उपलब्ध करता आला. पी. एम आर. डी. ए. अंतर्गत येणाऱ्या गावांना निधी उपलब्ध करून देता आला. याचे मला समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भागातील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उद्योगधंदे यांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.

तालुक्यातील ‘या’ गावातील नागरिकांशी साधला संवाद 

रावडे, खुबवली, आसदे, शिळेश्वर, भादस, संभवे, माले, शेरे, दिसली, जामगाव, अकोले, कळमशेत, आंदेशे, मांदेडे, खेचरे, बेलावडे, चिंचवड, कोंढावळे, पौड, विठ्ठलवाडी, गडदावणे या गावातील नागरिकांशी भेट घेत संग्राम थोपटे यांनी संवाद साधला.

यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेवअण्णा कोंढरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख सचिन खैरे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सविता दगडे, संतोष मोहोळ, रामभाऊ ठोंबरे, मा. सभापती कोमल वाशिवले, महिला काँग्रेसचे अध्यक्षा निकिता सणस, शिवसेना महिला संघटिका सुरेखा तोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्षा दीपाली कोकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Bhormaharashtravidhansabhaelection2024mlasangramthopateMulshirajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

भोर विधानसभा 'हाय व्होल्टेज' मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? 'हे' पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group