मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी जनता ही केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून सदैव माझ्यासोबत राहिली आणि यापुढेही माझ्या पाठीमागे भक्कम उभी राहील याची मला पूर्ण खात्री असल्याचा ठाम विश्वास संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तसेच आपण आजवर दिलेल्या आशीर्वादामुळेच या भागातील अनेक छोटे-मोठे महत्त्वाचे रस्ते, पूल, सभा मंडप, शाळा इमारती, समाजमंदिर, पाणीपुरवठा योजना, या कामासाठी निधी उपलब्ध करून देता आला असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर बावधन येथे प्रांत कार्यालय व पौड येथे तहसिल कार्यालय निधी उपलब्ध केल्याने सर्वसामान्य जनतेची काम लवकर मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भरे येथील क्रीडा संकुलही उभारण्यासाठी निधी उपलब्ध करता आला. पी. एम आर. डी. ए. अंतर्गत येणाऱ्या गावांना निधी उपलब्ध करून देता आला. याचे मला समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भागातील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उद्योगधंदे यांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
तालुक्यातील ‘या’ गावातील नागरिकांशी साधला संवाद
रावडे, खुबवली, आसदे, शिळेश्वर, भादस, संभवे, माले, शेरे, दिसली, जामगाव, अकोले, कळमशेत, आंदेशे, मांदेडे, खेचरे, बेलावडे, चिंचवड, कोंढावळे, पौड, विठ्ठलवाडी, गडदावणे या गावातील नागरिकांशी भेट घेत संग्राम थोपटे यांनी संवाद साधला.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेवअण्णा कोंढरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख सचिन खैरे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सविता दगडे, संतोष मोहोळ, रामभाऊ ठोंबरे, मा. सभापती कोमल वाशिवले, महिला काँग्रेसचे अध्यक्षा निकिता सणस, शिवसेना महिला संघटिका सुरेखा तोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्षा दीपाली कोकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.