नसरापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ ही शिक्षण क्षेत्रात आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रेरणादायी व आदर्श आहे. येथील वैविध्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासामध्ये भर घालत आहेत. केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अति उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले. दि. 7 ऑगस्ट रोजी आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शाळा केंजळला भेट दिली. जवळपास दोन तासांच्या या भेटी दरम्यान शाळेतील सुविधा, लोकवर्गणी व शासन निधीचा वापर या शाळेने उत्तम करून उत्तम दर्जाच्या उपलब्ध केलेला दिसून आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने स्काऊट गाईड कॅम्प, कला क्रीडा विषयक तासिका, आनंददायी शनिवार या सर्व बाबींचा प्रभावीपणे वापर केंजळ शाळेतील शिक्षक करीत असल्याचे त्यांनी बोलतााना नमूद केले. शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. बहुतांशी सर्वच बाबतीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळचे विद्यार्थी पारंगत असल्याचे आयुक्त सुरज मांढरे यांना दिसून आले.
कला, क्रीडा, अवांतर वाचन या बाबींनाही नियमित शिक्षणासोबत शाळा महत्त्व देत असल्याचे त्यांनी आधोरिखित केले. या प्रसंगी भोर पंचायत समितीचे राजकुमार बामणे उपस्थित होते. तसेच सारोळा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांच्या हस्ते आयुक्त सुरज मांढरे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांना पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळेस शाळेतील मुख्याध्यापक जे. के. पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते.
●आणखी दोन शाळेंना दिली भेट
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळू व शिंदेवाडी येथील देखील शाळेस भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
महावाचन अभियान…!
आनंददायी शनिवार, शालेय पोषण आहार, विद्यार्थी सुरक्षा, शालेय मैदान, भौतिक सुविधा, दप्तर त्यांनी हे उपक्रम पाहिले, त्याचबरोबर
वाचलेल्या पुस्तकांवर मुलांचे अभिप्राय, जीवनकौशल्यावर आधारित दैनंदिन जीवनातील व्यवहारातील विविध प्रश्न, त्यांची सोडवणूक कशी कराल, या संदर्भात मुलांशी बराच वेळ मनमोकळी चर्चा व मार्गदर्शन केले.