भोरः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल रात्री दि. २८ अॅाक्टोबर रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. युतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे युतीमधील इच्छुक असलेल्या अनेकांची नाराजी उफाळून आली. बंडखोरीचे निशान फडकवित अपक्ष म्हणून काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज दि. २९ अॅाक्टोबर रोजी भव्य रॅलीचे आयोजन करीत मांडेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
तसेच कुलदीप कोंडे हे नाराज झाले असून, त्यांनी अपक्ष उमेवारी अर्ज दाखल केला. त्यांनी देखील जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तहसिल कार्यलयासमोर दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणासदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. विकासकामे करताना कोणतेही मतभेद न ठेवता आपल्याला सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे.
तसेच युतीमधील घटक पक्षांना पुढे घेऊन जाऊन विकासकामे करायची असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. येत्या दोनच दिवसांत इच्छुकांना भेटणार असून, ते माघार कसे घेतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर एकत्रित प्रचाराला सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.