Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

संवाद मेळावाः आमदार संग्राम थोपटेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’; ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची केली घोषणा

मेळाव्यात अनेकजण काँग्रेसमध्ये दाखल, विरोधकांचा थोपटे परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्नः आमदार संग्राम थोपटे

by Team Rajgad Publication
October 21, 2024
संवाद मेळावाः आमदार संग्राम थोपटेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’; ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची केली घोषणा

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच या कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. थोपटे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागत त्यांनी केलेले सर्व आरोपी फेटाळून लावले. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली.

नाना पटोले, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणारः थोपटे 

आघाडीचे जागा वाटप अद्यापर्यंत अधिकृत जाहीर झाले नसले तरी भोरमधून आमदार संग्राम थोपटे यांना चौथ्यांदा संधी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर थोपटे यांनी २४ अॅाक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात केली. तसेच अर्ज भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आरोप

विरोधकांकडून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने आरोप केले जात आहेत. भोर एमआडीसबद्दल काही जण व्यक्तव्य करीत आहेत, त्या भागात कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. तुमच्या नावावर जागा आहेत, तर मग तुम्ही का देत नाही, असा खरा सवाल असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. तसेच एकीकडे जागा द्यायची नाही आणि एमआयडीसी मंजूर करीत नाही म्हणून विरोध दर्शवायचा प्रयत्न करण्याचे काम सुरू असल्याचे थोपटे म्हणाले. २४ अॅाक्टोबरला अर्ज भरणार असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भोरला फार्म भरण्यासाठी येणार आहे. तसेच खा. सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे सचिन अहिर हे देखील उपस्थित असणार असल्याची माहीती थोपटे यांनी दिली.

थोपटे परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. आता माझ्या पत्नीचा आणि मुलाचा देखील विरोधकांकडून नामउल्लेख होताना दिसत आहे. विकासा बद्दलचा कोणताही अंजेडा त्यांच्याकडे नसून केवळ थोपटे कुंटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. चुकीचा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काही मंडळीनी जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगबाबा धुमाळ, भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, भोर पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब थोपटे, वंदना धुमाळ, लहुनाना शेलार, मा. उपसभापती रोहन बाठे, मा. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, गीतांजली आंबवले, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काकासाहेब चव्हाण, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव सुके, संचालक उत्तमराव थोपटे उपस्थित होते.

तसेच मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती धनंजय वाडकर, भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, उपसभापती ईश्वर पांगारे, सा. कार्यकर्ते अनिलनाना सावले, माऊली दारवडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे, संचालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पावर पक्ष कार्याध्यक्ष संदीप नांगरे, रोहिदास जेधे, महिला अध्यक्षा विद्याताई यादव, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते, भोर तालुक्यातील पुणे स्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: BhorcongreesmlasangramthopatePunerajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
चिंचवडः राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते बंडखोरीचे निशाण फडकविण्याच्या तयारीत; विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप

चिंचवडः राष्ट्रवादीचे 'हे' नेते बंडखोरीचे निशाण फडकविण्याच्या तयारीत; विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group